सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर  8 एप्रिलला या ठिकाणी शाळांना सुट्टी जाहिर!

8 एप्रिल हा दिवस अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर यादिवशी दिवसा काही काळ पूर्ण अंधार पडणार आहे. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. हे सूर्यग्रहण अमावस्याच्या दिवशी बराच वेळ चालेल. सुमारे 5 तास 25 मिनिटे हे सूर्यग्रहण असेल.

वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात अनेक प्रकारचे दुर्मिळ योगही तयार होतील. यामुळे काही मिनिटे दिवसा काळोखा होईल. हेच नाही तर काही ठिकाणी तर शाळांना सुट्टया देखील जाहिर करण्यात आल्या आहेत. तब्बल 50 वर्षांनी असा योग्य आल्याचे देखील सांगितले जातंय. प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली जात असल्याचे सांगितले जातंय.

सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला पूर्णपणे झाकतो आणि दिवसा अंधार होतो. यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. या सूर्यग्रहणाचा भारतामध्ये फार काही परिणाम होणार नाहीये. हे सूर्यग्रहण जरी 5 तास 25 मिनिटे चालणार आहे आणि सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल. 8 एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरातील लोकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.

उत्तर अमेरिकेच्या काही भागात संपूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि सात मिनिटे ते नऊ सेकंद पूर्ण अंधार होईल.या सूर्यग्रहणामुळे उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये 8 एप्रिलला शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. हे सूर्यग्रहण कॅनडा, उत्तर अमेरिकेपासून मेक्सिकोपर्यंत दिसणार आहे.