सोलापूर बाजारपेठेत वाढली गर्दी……

चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद-उल-फित्र ( रमजान ईद) साजरी होणार असल्याचे शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी कळविले आहे. मंगळवारी (दि. ९) चंद्रदर्शन झाल्यास १० एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल.

मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यास ३० रोजे पूर्ण होत असल्याने गुरुवारी (दि.११) रमजान ईद साजरी करावी, असे शहर काझी यांनी सांगितले.ईदच्या निमित्तानं बाजारातदेखील उत्साह असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो.

सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी नमाजपठण झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.सध्या नमाजपठण होणाऱ्या मैदानावर स्वच्छता, रंगरंगोटी करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे.

मीना बाजार हाऊसफुल्ल रमजान ईदनिमित्त सोलापुरात भरलेला मीना बाजारात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणातगर्दी केली आहे.कपडे, ज्वेलरी, दागिने, शिरखुर्मासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स, दूध, शेवया, चारोळ्या, बेदाणे, काजू, बदाम, पिस्ता, तूप, साखर आदी विविध प्रकारचेसाहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठीगर्दी केली आहे.