वीज दर वाढीमुळे यंत्रमाग व्यवसाय…..

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर सर्वात जास्त आहे. त्यातच यावर्षी पुन्हा लादलेल्या दरवाढीने छोट्या मोठ्या उद्योगांसह यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे, अशी भीती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सदस्य आणि विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदरवाढ मंजुरीनुसार चालू आर्थिक वर्षात पुन्हा ७ ते ८ टक्के दरवाढ लागू झाली आहे.

आता १ एप्रिल २४ पासून सुरु झालेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १ लाख १५ हजार कोटी रुपये देयक मागणीस मंजूरी मिळाली आहे. यानुसार इथून पुढे सरासरी ७.५० ते ८ टक्के वीज दर वाढ लागू झाली आहे, परिणामी वीज आकार आणि वहन आकारामध्ये ६ ते १२ टक्के तर स्थिर आकारात १० टक्के दरवाढ झाली आहे.