अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढ तर होत चाललेली आहेच. त्याचप्रमाणे अनेक जण आपल्या जीवाची अवहेलना करताना पाहायला मिळतात. विटा येथील गुरुतेज नाश्ता सेंटरचे मालक अतुल म्हेत्रे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यांनी आत्महत्या केल्याने विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल म्हेत्रे हे खूपच कष्टाळू व प्रामाणिक होते. परंतु त्यांनी अचानक आत्महत्या का केली? याबाबतचा तपास विटा पोलीस करीत आहेत.
अतुल म्हेत्रे हे विट्यासह परिसरात अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून परिचित होते. गुरुतेज नाश्ता सेंटर या नावाने त्यांचा व्यवसाय सुरू होता. आता तो प्रभू या नावाने त्यांनी सुरू केलेला आहे. परंतु त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.