इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे आणि ती जबाबदारी मी शंभर टक्के पूर्ण करणारच असा ठाम निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी आयोजित जाहीर सभेत बोलून दाखवला विरोधकांना सुळकुड योजना राबवायची नाही त्यांना फक्त दुधगंगा योजनेच्या निमित्ताने आवाडेवरती टीका करून दुकानदारी चालवायची आहे अश्या शब्दात आवाडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या ताराराणी पक्षाच्या वतीने सोमवारी सायंकाळी घोरपडे नाट्यगृह चौकात दूधगंगा पाणी योजने संदर्भात आपली भूमिका विशद करण्यासाठी निश्चय सभेचे आयोजन केले होते.
या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आमदार आवाडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले मी इचलकरंजी चा विद्यमान आमदार आहे विद्यमान सरकारला माझा पाठिंबा आहे त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इचलकरंजी करांची परीक्षा पाहणार नाहीत अशी मला खात्री आहे दुधगंगा योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे तसे पत्र आपणाकडे आहे त्यामुळे योजना अडवण्याचा प्रश्नच नाही ही सर्व वस्तुस्थिती माहिती असूनही विरोधक केवळ राजकारणासाठी दुधगंगा योजनेच्या नावाखाली आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असणार नाही टीका टिपणी करून किंवा आंदोलन करून कोणताही प्रश्न सुटत नाही.
हे विरोधकांना माहिती आहे तरीही ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धडपड करीत आहेत. कृष्णा योजना ज्यावेळी आपण साकारली त्यावेळी याच विरोधकांनी कृष्णा योजनेला विरोध करून उलटी गंगा आणत असल्याचा आरोप आपल्यावर केला होता परंतू आपण ती योजना जिद्दीने साकारली त्यामुळे दुधगंगा योजना देखील मीच साकारणार आहे तसा विश्वास नागरिकांनाही आहे ही योजना यशस्वी करताना शहरात आणखीन सहा पाण्याच्या टाक्या बांधण्याची आवश्यकता आहे त्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहेत निधी मंजुरीचा विषयही लवकरच मार्गस्थ लागणार आहे असेही आमदार आवाडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
इचलकरंजीकराना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आपण शहरात शंभर ठिकाणी फिल्टर प्लान्ट बसविले परंतु ते पूर्ण क्षमतेने चालविले जात नाहीत भविष्यात यावत महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर त्यांना कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही तसेच विरोधकांनी आपल्या विरोधातील कोल्हे कोई थांबविली नाही तर सगळ्यांचा ठरवून कार्यक्रम करणार आहे असा इशाराही आमदार आवाडे यांनी आपल्या भाषणातून दिला सभेच्या सुरवातीस ताराराणीचे शहर अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक युवानेते राहुल आवाडे यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून ताराराणी पक्ष स्थापने मागीलइतिहास विशद केला तर लोकसभेची निवडणूक लढविण्याचा आदेश द्यावा अशी विनंती आमदार आवाडे यांच्याकडे त्यांनी केली शेवटी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले सभेसाठी ताराराणी पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.