मिरजेत मंगळसूत्र चोरी प्रकरणी महिलेस अटक

बेथेलहेमनगर येथे महिलेस धक्काबुक्की करून २८ हजाराचे मंगळसूत्र लंपास केल्या प्रकरणी कृष्णाबाई राजू सातपुते वय ४५ हिच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात जयश्री संजय पाटील यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार कृष्णाबाई सातपुते हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जयश्री संजय पाटील बेथेलहेमनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यामध्ये कृष्णाबाई राजू सातपुते यांच्यात शेतजमिनीचा वाद सुरू होता. न्यायालयात जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असताना कृष्णाबाई राजू सातपुते यांनी जयश्री संजय पाटील यांच्याशी वादावादी करून व धक्काबुक्की करून जयश्री संजय पाटील यांच्या गळ्यातील २८ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याप्रकरणी जयश्री पाटील यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिल्यानंतर कृष्णाबाई सातपुते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यात गांधी चौक पोलिसांनी आरोपी कृष्णाबाई राजू सातपुते या महिलेस आज अटक केली असून याबाबतचा अधिक तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.