आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी दणदणीत विजय मिळवला. या निमित्ताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अकरा वर्षाचा दुष्काळ संपवत मानाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एकच उत्साह आनंद काल पाहायला मिळाला.
इचलकरंजी शहरांमध्ये टी-20 वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर शहरातील क्रिकेट प्रेमींनी जनता बँक चौका मध्ये येऊन गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीसह आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शहरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. इचलकरंजी शहरातील क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावर एकच आनंद व्यक्त होत होता. शेवटच्या क्षणापर्यंत भारताने विजयाचा आत्मविश्वास कायम राखून शेवटच्या चेंडूपर्यंत भारताने चिकाटीने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
इचलकरंजी शहरात क्रिकेट प्रेमी हजारोंच्या संख्येने एकत्रित येऊन भारत माता की जय व भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी काही क्रिकेट शौकींनी विराट कोहली, रोहित शर्मा यांचे हातामध्ये फलक घेऊन जल्लोष केला. रात्री बारा वाजता जनता बँक चौकामध्ये अभूतपूर्व असा क्रिकेट शौकींनांचा जल्लोष पाहायला मिळाला.