महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या टेक्सटाईल अँड अ‍ॅपरल समिती चेअरमन पदी डॉ. राहुल आवाडे यांची निवड…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या ‘टेक्सटाईल अ‍ॅण्ड अ‍ॅपरल’ समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष ललित गांधी यांनी निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे.

व्यापार, उद्योग, कृषी उद्योग व सेवा क्षेत्राची ही शिखर संस्था आहे. या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये पदसिद्ध सदस्यपदीही त्यांची निवड झाली आहे. ते कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना केन समितीचे अध्यक्ष आहेत.