उद्या गुरूवारी ईदगाह मैदानावर सामुदाईक नमाज पठण

उद्या रमजान ईद साजरा होणार आहे. सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन उद्या सामुदाईक नमाज पठण करतात. ईदगाह मैदानावर उद्या सामुहिक नमाज इचलकरंजी रमजान ईद (ईद- उल-फित्र) ची सामुहिक नमाज पठण गुरूवार दि. ११ एप्रिल रोजी ठिक सकाळी ८.४५ वाजता येथील ईदगाह मैदानावर आयोजित केली आहे. रमजान ईद ( ईद-उल- फित्र) ईदची नमाजची वेळ व इतर विषयांवर चर्चा करणेसाठी हजरत सय्यद मगदुमवली दर्गा व इदगा ट्रस्टच्या वतीने समाजाचे प्रमुख मान्यवर व मस्जिदचे प्रमुखांची बैठक बोलविली होती.

या बैठकीत चर्चेमध्ये नमाजची वेळ सकाळी ८.४५ वाजता निश्चित करणेत आली आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांना आपआपली बिछाईत घेऊन वेळेवर नमाज अदा करणेसाठी हजर रहावे असे आवाहन ईदगाह ट्रस्टच्यावतीने बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी केले आहे.