पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काही ठिकाणी कामात अडथळे येत आहेत. खास करून ज्या ठिकाणी गाव, वस्ती आहे. त्या ठिकाणी रस्त्याची कामे रेंगाळली आहेत. सहापदरीचे काम नेमके कोठेपर्यंत याचा ठोस अंदाज नसल्याने रस्त्याकडेला असलेल्या अनेक व्यावसायिक व रहिवाशांचे धाबे दणालेले आहेत.
महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळा चालू होण्यापूर्वी रस्त्याकडचे मार्किंग पूर्ण करून द्यावे. तसेच काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणांची माहिती द्यावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या कामामुळे शेजारी घर
असणाऱ्या रहिवाशी व व्यावसायिकांना पाणी साचण्याचा धोका सतावत आहे.