संतोष देशमुख यांची हत्या अतिशय वाईट पध्दतीने करण्यात आली. ही मुळात घटनाच अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या हत्येप्रकरणातील वाल्मिक कराड याच्यासह साथीदारांना कठोरातील कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी शिवसैनिक मोठा लढा उभारत आहेत. या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे रविंद्र माने यांनी सांगितले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी न्यायालयात तपास यंत्रणेने ठोस पुरावे सादर केल्यानंतर राज्यभर या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करीत सत्ता पक्षातील शिवसेना आक्रमक झाली आहे. इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा येथे हे आंदोलन होणार आहे. तीन महिन्यापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निष्तूर आणि मानव जातीला काळीमा फासेल अशा पध्दतीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केली. या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावरती व्हायरल केले. याप्रकरणात राज्यभर तीव्र संताप फुटला.
विधानसभेत आमदार सुरेश धस यांनी आवाज उठविल्यानंतर तपासाला गती आली. या प्रकरणात पोलीस तपास यंत्रणेने सोमवारी न्यायालयात या प्रकरणातील फोटो, व्हिडीओ पुरावे सादर केले. हे सर्व फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत सत्ता पक्षातील शिवसेना आक्रमक झाली आहे.
–