पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला, असं वक्तव्य शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केलं आहे.हातकणंगलेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करूनही दाखवली, असंही खासदार धैर्यशील माने म्हणाले आहेत.
दरम्यान, निकालाआधीच गुलाल लावणारे विरोधक निकालानंतर जोतिबाला जाऊन आलोय, असं सांगत होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिराळामधील एका सत्कार सोहळ्यात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.