रामलिंग बेट येथे श्रीराम जन्मसोहळा

बहे (ता. वाळवा) येथे श्री क्षेत्र रामलिंग बेटावर बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी दुपारी १२:०० वाजता श्रीराम जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे. रामलिंग बेट येथे कृष्णेच्या पात्रात अकरा मारुतीपैकी एक देवस्थान आहे. याच ठिकाणी श्रीराम यांचे मंदिर आहे. सालाबादप्रमाणे श्रीराम जन्मसोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात स्थानिक बडवे आणि बहे ग्रामस्थ यांचा सहभाग असतो. भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसाद पाटील यांनी केले आहे.