वैयक्तिक भेटीगाठींवर खासदार माने यांचा भर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी पहिल्या टप्प्यात वैयक्तिक गाठीभेटींवर दिला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून घटक पक्षातील प्रमुख पदाधिकार्ऱ्यांची भेट घेत आहेत.

उमेदवारी दाखल केल्यानंतर जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांच्या प्रचारास गती येणार आहे, तर भाजपच्या वतीने बूथ पातळीवर सध्या माने यांच्या प्रचाराचे नियोजन सुरू केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून लोकसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थीती लावण्यासह प्रमुख मान्यवरांच्या भेटी घेण्यावर खासदार माने यांनी भर दिला आहे.

या भेटीमध्ये निवडणुकीत आपल्या पाठीशी राहण्याबाबत ते विनंती करीत आहेत. भेटीगाठी घेण्यामध्ये त्यांचा दिवस व्यस्त राहत आहे. आज जयसिंगपूरसह शिरोळ परिसरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. विशेषतः भाजपच्या पदाधिकार्ऱ्यांच्या भेटीत संभाव्य प्रचार यंत्रणेचा आढावा घेत आहेत.