बसस्थानकाचे सुशोभिकरण अंतिम टप्प्यात, प्रवाशांतून सामाधान

इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती तर काही भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या इचलकरंजी शहरातील बसस्थानक सुशोभीकरण काम सुरु आहे. सध्या हे काम आता अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता वाढू लागली आहे. इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

बसस्थानकाच्या दोन्ही फ्लॅटफॉर्मचे कामाचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले असून स्थानकाच्या मुख्य इमारतीतील विद्युतीकरण काम सुरु झालेले आहे. अद्याप स्वच्छता गृहाचे काम बाकी आहे, तेही लवकरच पुर्ण करण्याची आशा आहे. प्लॅटफॉर्मचे काम पुर्ण झाल्यामुळे प्रवाशांतून सामाधान व्यक्त होत आहे.