नाम. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांचा वाढदिवस तिथीनुसार बुधवारी दि. १७ म्हणजेच श्री. रामनवमी दिवशी होत आहे. सबंध जिल्हाभर हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. आसुर्लेकर- पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

बैठकीच्या सुरुवातीला इचलकरंजीचे नगरसेवक नितीन जांभळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री पाटील म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या 35 ते 40 वर्षांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्ची घातली आहे.

म्हणजे त्यांचे आणि गोरगरिबांचे ऋणानुबंध हे घट्ट आहेत. या लोकनेत्याचा वाढदिवस आरोग्य शिबिरे, रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबीर, विविध देवतांच्या आरत्या अशा सामाजिक उपक्रमानी साजरा करा असे पाटील म्हणाले.