Pushpa 2 OTT : रिलीज आधीच ‘पुष्पा 2’ने कमावले 160 कोटी

 सध्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे चित्रीकरण  जोमाने सुरू असून 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘पुष्पा-2’ मधील त्याचा टीझर लाँच करण्यात आला. या चित्रपटाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

या चित्रपटावर प्रचंड खर्च करण्यात येत असून जवळपास 500 कोटींचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे मोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच रिलीजपूर्वी ‘पुष्पा 2’ ने 160 कोटींची कमाई केली असल्याचे म्हटले जात आहे. सहा मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 60 कोटी रुपये खर्च केले असून आणि सीन पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागले.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सीनमध्ये गंगाम्मा जत्रा आणि त्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. सहा मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 60 कोटी रुपये खर्च केले असून आणि सीन पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, या सीनमध्ये गंगाम्मा जत्रा आणि त्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.