दबंग भाईजानची चाहत्यांना मनोरंजनाची ईदी!

यंदाच्या रमझान ईदला बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा यंदाच्या ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज झाला नाही. त्याने काही प्रमाणात नाराज असलेल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी भाईजानने ईदच्या दिवशी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खानचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. ‘सिंकदर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 

यंदाच्या रमझान ईदला बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपल्या चाहत्यांना मनोरंजनाची ईदी देताना सलमानने खास ट्वीट केले आहे. यंदाची ईद ही  ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ सोबत साजरी करा आणि पुढील वर्षीची ईद ही ‘सिंकदर’ सोबत साजरी करा असे सलमान खानने सांगितले.

सलमान खान मुख्य भूमिकेत असून ए. आर. मुरुगद्दोस हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, साजिद नाडियाडवाला निर्माते आहेत. ए. आर. मुरुगदास सिंकदरचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटात अॅक्शनचा तडका असणार असल्याची शक्यता आहे.  या आधी ए. आर. मुरुगदास यांनी गझनी सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

रोमँटिक-अॅक्शनपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याशिवाय, त्यांनी हॉलिडे: ए सोल्जर इस नेवर ऑफ ड्युटी या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय मुरुगदास यांनी तामिळ सिनेइंडस्ट्रीत काही हिट चित्रपट दिले आहेत. आता, साजिद नाडियाडवाला, मुरुगदास आणि सलमान खान हे त्रिकुट एकत्र येत असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. मागील वर्षी सलमानचा ‘टायगर-3’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये कतरिना कैफ,  इमरान हाश्मीची भूमिका होती. यशराज फिल्मसच्या स्पाय युनिर्व्हस सीरिजमधील हा चित्रपट होता.करण जोहरसोबतचा ‘द बुल’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हे चित्रपटही आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.