गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक…

मागच्या ८ दिवसांत झालेल्या सणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांनी मोठी कमाई केली आहे. गोकुळकडून रमजान ईद निमीत्त दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.यादिवशी २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री असल्याची माहिती चेअरमन अरूण डोंगळे यांनी दिली.

चेअरमन डोंगळे म्हणाले कि, रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली असल्याची माहिती डोंगळे म्हणाले.

गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.