कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं.या भेटीनंतर संजय मंडलिक यांची उमेदवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याचे समजते. मंगळवारी त्यांच्या नावावर अधिकृत घोषणा होणार आहे.
वेळ औपचारिकता बाकी असल्याचे सांगत खासदार मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचाराला सुरुवात करा, असे आदेश दिलेत. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार संजय मंडलिक (Sanjay Madlik) यांच्याशी फोनवर चर्चा केली.