‘या’ तारखेपर्यंत पावसाची शक्यता……

मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्याने भाळवणी, मरवडे, तळसंगी, डिकसळ येथील एकूण २१ नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अक्षरशः संसार उघड्यावर आला आहे.

हवामान विभागाकडून १३ एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्यानंतर पावसाची शक्यता नाही. त्यामुळे रविवार १४ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मागील काही दिवसांपासून हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच ‘यलो’ अलर्ट देण्यात आला होता. या अंदाजानुसार शहर व जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. काही दिवस ढगाळ वातावरण होते.

त्यामुळे तापमानात सतत आठ दिवस घट झाल्याचे पाहायला मिळाले. १३ एप्रिलपर्यंतच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे इथून पुढे तापमानात वाढ होईल अशी शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.