हातकणंगलेतून पहिल्या दिवशी वंचितचा अर्ज दाखल

काल शुक्रवारपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२४ अशी आहे. पहिल्याच दिवशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाटील दादासाहेब / दादगोंडा चवगोंडा यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केला आहे.

तर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ६३ उमेदवारांनी १३७ नामनिर्देशन पत्रे नेले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यामध्ये ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवारांनी ७० नामनिर्देशन पत्राचे फार्म नेले आहेत मात्र आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांनी ६७ नामनिर्देशन पत्राचे अर्ज नेले असून पहिल्या दिवशी पाटील दादासाहेब / दादगोंडा चवगोंडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

.