खानापूर तालुक्यातील देवीखिंडी व वेजेगाव येथील ग्रामसेवक सोमनाथ सपाटे यांनी या दोन गावांतील गावठाण मालमत्ता पती व पत्नीच्या संयुक्त नावावर करण्याचे काम १०० टक्के पूर्ण केले. त्यांनी शासनाच्या कामकाजात कार्यतत्परता दाखवून ही दोन गावे जिल्ह्यात पहिली आणली आहेत.
तसेच, पंचलिंगनगर येथील ग्रामसेवक विलास जाधव आणि देवनगरचे ग्रामसेवक हनमंत चव्हाण यांनीही कराच्या रकमेची १०० टक्के वसुली करून तालुक्यात उच्चांकी काम केले आहे. खानापूर तालुक्यातील देवीखिंडी व वेजेगाव या दोन गावांतील गावठाण मालमत्ता पती-पत्नीच्या संयुक्त नावावर करून जिल्ह्यात आदर्श काम करणारे ग्रामसेवक सोमनाथ कुमार सपाटे यांचा खानापूर पंचायत समितीत विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी पंचलिंगनगरचे ग्रामसेवक विलास बाळू जाधव व देवनगरचे ग्रामसेवक हनमंत रामचंद्र चव्हाण यांनीही घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल या दोन ग्रामसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे ग्रामसेवकांना बळ मिळाले असले तरी अन्य ग्रामसेवकांनाही काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे सहाजिकच विकासगंगा अवतरेल.