आमदार सुहास बाबर यांची रखडलेल्या उपकेंद्र कार्यान्‍वितची विधिमंडळात मागणी

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली चुणूक दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे महावितरणने साडेतीन कोटी खर्च करून ३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारले आहे. मात्र वनविभागाने तीन विद्युत पोल उभा करण्याची परवानगी दिली नसल्यामुळे ते सुरू झाले नाही. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी उपकेंद्राचा अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली. शेटफळे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांनी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्याकडे शेतीच्या विजेचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. टेंभूचे पाणी आल्यामुळे वीज मागणी वाढली आहे.

परिणामी करगणी उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडला. आठवड्यातून तीन दिवस मिळणारी वीज चारच तास मिळते. त्यामुळे आमदार अनिल बाबर यांनी प्रयत्न करून साडेतीन कोटींचे उपकेंद्र उभारले. कामही पूर्ण झाले. मात्र ते सुरू झाले नाही. हाच मुद्दा आमदार बाबर यांनी अधिवेशनात मांडला.आमदार बाबर म्हणाले, ‘साडेतीन कोटी खर्चून वीज उपकेंद्र उभारले. त्याचा उपयोग ११ गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे. उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले. पाचेगाव (ता. सांगोला) येथून वीजपुरवठा येतो. उपकेंद्राला जोडला जाणाऱ्या वीजपुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. अपवाद पाचेगावात वन विभागाच्या हद्दीत तीन पोलचे काम झालेले नाही.

वन विभागाकडे महावितरण अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना पोल उभा करण्याची दिली नाही. परिणामी उपकेंद्राचे संपूर्ण होऊनही कार्यान्वित झाले नाही. तेंव्हा शासनाने स्तरावर यातून मार्ग काढून विद्युत उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.