सांगोल्यात उपलब्ध होणार 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स

सांगोला तालुक्यातील नाझरा परिसरामध्ये गरजू गरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सचा लाभ मिळावा यासाठी 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स उपलब्ध व्हावी अशी मागणी केली होती. नाझरा परिसरातील 20 ते 25 गावाला 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स उपलब्ध व्हावी अशी मागणी भारत विकास कंपनी बिव्हीजी यांना जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या पाठपुरावाला यश येत आहे. यासाठी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे.

108 क्रमांकाची ॲम्बुलन्स मिळावी यासाठी डॉक्टर वैभव जागळे यांच्याकडे मागणी पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हास्तरावरून तात्काळ कारवाई होईल असे आश्वासन नितीन भाऊ रणदिवे व त्यांच्या बहुजन भारत सामाजिक संघटनेला देण्यात आले आहे. यामुळे नाझरा व नाझरा परिसरातील अनेक गरीब लोकांना ही 108 क्रमांकाची अत्याधुनिक अशी ॲम्बुलन्स उपलब्ध होणार आहे.