सांगोल्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन

उद्या मंगळवारी 9 एप्रिलला गुढीपाडवा म्हणजेच नूतन वर्षाभिनंदन साजरा होणार आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे. नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून उभी करण्याची प्रथा आहे.

आज आठ एप्रिल ला सूर्यग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी वैधृती योग असला तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याचा दिवस शुभच आहे. सांगोला तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात गुढीपाडवा उत्साहात साजरा करावा असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी पंचांगातून सांगितले आहे.