यंत्रमागधारकांत तीव्र नाराजी…..

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत सतत पाण्याची टंचाई तर कधी यंत्रमागधारकांचे प्रश्न हे वरचेवर असतातच. वीज सवलत मिळविण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया किचकट केल्याने अनेक यंत्रमागधारकांनी योजनेकडे पाठ फिरवली. परिणामी, मार्च महिन्यातील वीजबिले सवलत न मिळताच आल्याने यंत्रमागधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

२७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना प्रतियुनिट १ रुपये सवलत राज्य सरकारने जाहीर केली होती. परंतु त्यासाठी यंत्रमागधारकांना नोंदणीची अट घातली होती. नोंदणीची अट जाचक असल्याने त्याला यंत्रमागधारकांनी विरोध दर्शविला होता. मार्च महिन्यातील वीजबिले पूर्वीप्रमाणे आली आहेत. यामुळे यंत्रमागधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.