अलीकडे गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ पहायला मिळत आहे. कधी खून, मारामारी तर कधी महिलांवर अत्याचार. अशीच एक घटना आटपाडी तालुक्यात उघडकीस आलेली आहे. एका विवाहितेवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. रानमळा शेटफळे (ता.आटपाडी) येथे विवाहितेला गाडीवर बसायला भाग पाडले, गाडीवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे.
याबाबत पिडीत महिलेने आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सतिश रामहरी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला ही चालत घरी येत असताना सतिश रामहरी गायकवाड (रा. आटपाडी) याने तिला मी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणून पिडीत महिला नको म्हणत असतानाही तिला गाडीवर बसायला भाग पडले.
यावेळी महिला गाडीवरून खाली पडल्यानंतर त्याने तिला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रामहरी गायकवाड याने तेथून पलायन केले. सदर महिलेचा पती आसाममध्ये गलाई व्यावसायिकाच्या दुकानात कामाला आहे. या महिलेने पतीला ही गोष्ट कळविल्यानंतर तिचा पती गावी आला. त्याने पत्नीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दिली. आटपाडी पोलीसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.