इचलकरंजीतील रोटरी क्लब पाच पुरस्कारांनी सन्मानित…..

इचलकरंजी येथील रोटरी क्लब येथे अनेक उपक्रम राबविले जातात. अनेकजण या उपक्रमांमध्ये अगदी उस्फुर्तपणे सहभागी देखील होतात. इचलकरंजी येथील रोटरी क्लबच्यावतीने २०२२-२३ मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्टच्या कॉन्फरन्समध्ये इचलकरंजी रोटरी क्लबला बेस्ट प्रेसिडेंटसह इतर पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग व गोवा संपूर्ण राज्यातील रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये १५० क्लब कार्यरत आहेत. यामध्ये चांगल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. २०२३-२४ ची ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्टची कॉन्फरन्स कोल्हापूर येथे संपन्न झाली. यावेळी रोटरी गव्हर्नर नासिर बोरसादवाला, पीडीजी. व्यंकटेश देशपांडे, सौ. संध्या देशपांडे, आनंद कुलकर्णी, राजू जोशी, डीजीएन रो. अरुण भंडारे यांच्या हस्ते अॅवॉर्डचे वितरण झाले.

यामध्ये रोटरी क्लब इचलकरंजीचे बेस्ट प्रेसिडेंट म्हणून सत्यनारायण धूत यांना हा अॅवॉर्ड मिळाला. तसेच बेस्ट इन कम्युनिटी सर्विस, बेस्ट इन पब्लिक रिलेशन, बेस्ट इन वोकेशनल सर्विस, बेस्ट इन क्लब बुलेटीन, बेस्ट इन क्लब सर्विस असे महत्त्वाचे ॲवॉर्ड देऊन इचलकरंजी रोटरीला गौरविण्यात आले.