बॉक्स ऑफिसवर एकत्र भिडणार ‘पुष्पा २’ आणि ‘सिंघम अगेन’

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ अर्थात सिंघमच्या तिसऱ्या भागाची सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, अद्याप या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण न झाल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपटाची नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येईल. समोर आलेल्या माहितीनुसार आता २०२४ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड हंगामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिनीनुसार, रोहित शेट्टी आणि अजय देवगण सध्या सिंघम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असं याआधी रोहित शेट्टीने जाहीर केलं होतं. परंतु, सध्या चित्रपटाच्या शूटिंगला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित आणि अजयला ठरलेल्या तारखेलाच चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी कोणतीही घाई करायची नाही. कोणतीही तडजोड न करता शूटिंग व्यवस्थित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे.सध्या या चित्रपटाची टीम दिवाळी २०२४ मध्ये ‘सिंघम अगेन’ रिलीज करण्याचा विचार करत आहे. यामध्ये रणवीर सिंह,अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान हे सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अर्जून कपूर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

तारखेत बदल केल्यामुळे रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा बॉक्स ऑफिस क्लॅश टळणार आहे.‘पुष्पा २’ आणि ‘सिंघम अगेन’ या दोन्ही चित्रपटांती रिलीज डेट १५ ऑगस्ट जाहीर केल्याने बॉक्स ऑफिसवर नेमकं कोण बाजी मारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु, निर्मात्यांनी ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने आता दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.