ट्रेनमध्ये सीटसाठी लाथाबुक्क्यांनी हाणामारी, VIDEO व्हायरल

ट्रेनमधील मारामारी आणि भांडणाचे व्हिडीओ आपण पाहिले असतील. अनेकदा फक्त सीटवर बसण्यासाठी भांडण होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याला हवी असलेली सीट मिळवण्यासाठी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झालीये. 

हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, ट्रेनमधील अपर बर्थवर एक तरुण आधीच बसलेला आहे. त्याच्या शेजारी दुसरा एक तरुण येतो. त्याला देखील याच सीटवर बसायचं असतं. त्यामुळे या दोघांमध्ये एकाच सीटवरून वाद होतो.

पुढे या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. दोघांची हाणामारी त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन एक व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलीये. सीटवरून भांडताना दोन्ही तरुणांना हा व्यक्ती शांत बसण्यास सांगत आहे. मात्र दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करतात.

दोघांची भांडणे सुरू असताना ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला चार लाखांहून अधिल लोकांनी पाहिलंय. नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत आहेत.