इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते हे सर्वांना माहितच आहे. शहराचा पाणीप्रश्न जगजाहीर आहे. परंतु अजूनही हा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक निवडणुकीत इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न आहे तसाच पहायला मिळत आहे. इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावरून राजकारण केले जाते. नेत्यांच्या राजकीय साठमारीमुळे शहरवासीय मात्र तहानलेलेच राहिले आहेत.
प्रत्येकवेळी नदी आणि स्रोत बदलणे यापलीकडे ठोस काही होताना दिसत नाही. या पाच वर्षांतही तेच झाले आहे. योजना बदलली, नदी बदलली, परंतु आजतागायत शुद्ध व मुबलक पाणी मिळाले नाही. पाण्याच्या त्रासलेल्या राजकारणाला शहरवासीयांनी यावर ठोस उपाय काढण्यासाठी या निवडणुकीत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. शहरासाठी पंचगंगा नदीतून पाणी उपसा करणारी योजना