लोकसभा निवडणूक 2024: प्रचाराला ब्रेक, उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. शुक्रवारी देशभरातील १०२ जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर उद्या १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.पहिल्या टप्प्यात देशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. त्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे.

मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर उद्या मतदान होणार आहे.