कॉफी नाही; दररोज सेवन केले जाणारे हे पेय Cancer चे खरं कारण? तज्ज्ञांचा इशारा

काही लोकांना चहा तर काही लोक हे कॉफी (coffee) प्रेमी असतात. कॉफीच्या सेवनामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. कॉफीमुळे मेंदूची शक्ती वाढवणे, ऊर्जा वाढवणे, मूड सुधारणे आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तरीही कॉफीबद्दल अनेक गैरसमज आजही लोकांमध्ये आहेत. कॉफीचे जसे फायदे आहेत, तसेच कॉफीच्या अतिसेवनामुळे तुमच्या शरीराचे नुकसानही होते. जास्त कॉफी पिण्यामुळे चिंता, निद्रानाश, पचनाच्या समस्या आणि हृदयाचे ठोके वाढणे असे दुष्परिणाम पाहिला मिळतात.

TOI च्या अहवालानुसार कर्करोग आहार तज्ज्ञ डॉ. निकोल अँड्र्यूज हे सांगतात की, कॉफीचे अनेक फायदे आणि तोटे असतात. मात्र कॉफीबद्दल लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. काही लोकांना वाटतं कॉफी प्यायल्याने कर्करोग होतो. पण काही कप कॉफी प्यायल्याने कर्करोगाचा धोका वाढतो असे म्हणणे चुकीचे आहे.

निकोल अँड्र्यूज यांनी अलीकडेच अहवाल दिला आहे की, आपण जे पेये पितो ते कर्करोगाच्या जोखमीवर परिणाम करतात. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये, निकोल आश्वासन देते की, कॉफीला निरोगी आहाराचा भाग बनवायला पाहिजे.

कमी कॉफी पिण्याचे अनेक फायदे

जास्त साखर आणि चरबीयुक्त कॉफी न घेण्याचा सल्ला ते देतात. पण जर आपण कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केलं तर त्याचे आरोग्यासाठी नक्कीच फायदा होतो.

या पेयामुले कर्करोगाचा धोका वाढवतो?

निकोल यांनी सांगितलं की, कॉफी (coffee) नाही तर कॅन्सरचा सर्वाधिक धोका हा दारूपासून आहे. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, सर्व प्रकारचे अल्कोहोल कर्करोगाचा धोका वाढवतात. जरी दारू पिणाऱ्या प्रत्येकाला कर्करोग होत नसला तरी, दारूचे सेवन कमी केल्याने कर्करोगाचा धोका कमी नक्कीच होतो. अल्कोहोलशी संबंधित धोके केवळ कर्करोगापुरते मर्यादित नसतात. जास्त मद्यपान केल्याने अपघात, उच्च रक्तदाब आणि यकृताच्या आजाराचा या सारखा धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

दारू पिल्याने 7 प्रकारच्या कर्करोगाचा धोका !

तज्ज्ञांनी सांगितले की, अल्कोहोल पिल्याने स्तन, पोट, तोंड, घसा आणि यकृताच्या कर्करोगासारख्या विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. एनएचएस सल्ला देते की पुरुष आणि महिला दोघांनीही आठवड्यातून 14 युनिटपेक्षा जास्त अल्कोहोलचं सेवन करु नये.

अल्कोहोल कर्करोगाचा धोका कसा वाढवतो ?

जितके जास्त अल्कोहोल प्याल तितका धोका जास्त असतो. अल्कोहोल शरीरात विघटित होते आणि ‘एसीटाल्डिहाइड’ नावाचा हानिकारक पदार्थ तयार करते, जो डीएनएला नुकसान पोहोचवू शकतो आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. अल्कोहोल तोंड, घसा, अन्ननलिका यकृत, आतडे, गुदाशय, स्तन आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.