हातकणंगलेयेथे लालवाणी परिवारातर्फे नव्याने उभारलेल्या जैन मंदिरात २१ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान भव्य अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन केले आहे.दरम्यान २२ ते २६ असे पाच दिवस पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव होईल. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अरुणकुमार लालवाणी यांनी दिली . महावीर जयंतीचे औचित्य साधुन रविवारी (ता. २१) सुरुवात होईल. सकाळी आठला हातकणंगले येथील जिन मंदिरातून आचार्य श्री जिनमाणिप्रभसूरीश्वरजी महाराजांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघणार आहे.
मंगळवारी (ता. २२) च्यवन कल्याणक, २३ ला जन्मकल्याणक , २४ रोजी नामकरण सोहळा, २५ रोजी दीक्षा कल्याणक तर २६ रोजी मंगल प्रतिष्ठा महोत्सव आहे. याकाळात वेदिकापूजन, जन्म कल्याणक महोत्सव, नामकरण, पाठशाला गमन, लग्नोत्सव, देव देवीपूजन, संगीत संध्या आदी धार्मिक कार्यक्रम होतील.रोज सायंकाळी महाराजांचे मंगल प्रवचन होईल. महोत्सवासाठी राजस्थानमधील जयपूर पॅलेसची भव्य प्रतिकृती उभारली आहे.