आयपीएलमध्ये काल राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात मॅच झाली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेटवर 179 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नेहाल वढेरानं चांगली फलंदाजी केली.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं चांगली सुरुवात केली होती. पावसामुळं बराच वेळ खेळ थांबवावा लागला होता. यशस्वी जयस्वालनं 31 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं फलंदाजीचा गियर बदलला. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं शतकी भागिदारी केली. यशस्वी जयस्वालनं देखील महत्त्वाच्या मॅचमध्ये 59 बॉलमध्ये शतक झळकवलं. त्यानं 104 धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थाननं मुंबईला 9 विकेटनं पराभूत केलं.