IND vs ENG Odi Series : 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i मालिकेची सांगता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली. टी 20i मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा भारताने जिंकला. टीम इंडियाने यासह ही मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. आता वेळ आहे एकदिवसीय मालिकेची. टीम इंडिया टी 20i प्रमाणे वनडेतही अप्रतिम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर पराभूत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतून पलटवार करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.

अशात ही मालिका चुरशीची होणार आहे. मालिकेतील सर्व सामने कुठे पाहायला मिळतील? सामन्यांना केव्हा सुरुवात होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयातइंडिया इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळवले जाणार आहेत. सलामीचा सामना हा नागपूरमध्ये, दुसरा कटक तर तिसरा आणि अंतिम सामना हा अहमदाबामध्ये पार पडणार आहे. तिन्ही सामने 2 दिवसांच्या अंतराने खेळवण्यात येणार आहे. सलामीचा सामना हा 6 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 9 तर तिसरा सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

एकदिवसीय मालिका केव्हापासून?

इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

मोबाईलवर कुठे पाहता येतील?

इंडिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सामने मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळलीत.