दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतात, समृद्धी आणि सुख-संपत्तीसाठी प्रार्थना करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण सोन्याचे दागिने, चांदीची नाणी यासह अनेक नवीन वस्तू खरेदी करतात. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आली आहे. या दिवशी धन पूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? जाणून घेऊया.
या वर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी, म्हणजेच मंगळवारी साजरी केली जात आहे.
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. मात्र उदयतिथीनुसार, धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.
धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंत असेल, अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल.
प्रदोष काळ: संध्याकाळी 6:01 वाजेपासून ते रात्री 8:27 पर्यंत
वृषभ काळ: संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत
त्रयोदशी तिथी प्रारंभ: 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पर्यंत
त्रयोदशी तिथी समाप्त: 30 ऑक्टोबर 2024 दुपारी 1:15 पर्यंत
धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पाटावर देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवावा. कुबेर देव आणि धन्वंतरि देवाची पूजा करावी. नंतर तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी दाराजवळ दिवे लावावे. घरातील दागदागिने, पैसे तिजोरीतून बाहेर काढून त्याची पूजा करावी आणि पुन्हा तिजोरीत ठेवून द्यावे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाला पिवळी मिठाई अर्पण करा. यानंतर मंत्रोच्चार करुन आरती करा. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करणं शुभ समजलं जातं.