उन्हाळी पोहा पापड रेसिपी….

पोहे पापड

साहित्य- जाड पोहे एक वाटी, ओवा, जीरे, चवीनुसार मीठ, हिंग, पापडखार, लाल मिरची पावडर आणि तेल.

कृती-
१) जाडे पोहे घेऊन ते थोडावेळ मंद आचेवर भाजून घेणे.

२) नंतर ते पोहे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून चाळून घेणे.

३) एका पातेल्यात वाटीभर पाणी घेऊन त्यात मीठ ओवा जीरे  लाल मिरची पावडर हिंग पापडखार हे सर्व साहित्य घालणे किंवा हिरवी मिरची वाटून घालणे.

४) आता हे गरम पाणी त्या पिठात घालून पिठ चांगले मउ मळून घेणे. हे पिठ चांगले कुटुन घेणे किंवा थोडे थोडे मिक्सरमध्ये फिरवून घेणे.

५) थोडे थोडे पिठ घेऊन मळणे म्हणजे नंतर पापड तुटत नाही करताना.

६) तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून पापड यंत्रात दाबून पातळ पापड तयार करणे आणि साडीवर वाळत घालणे.

७) चांगले दोन तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवणे आणि नंतर डब्यात भरून ठेवणे.

८) गरम तेलात तळून घेणे, छान खुसखुशीत पापड होतात.