शरद पवार यांची सभा सुरु असतानाच…….

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना शरद पवार यांचे कट्टर समर्थकांचा आहे. कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा अभिजित पाटील यांच्याकडे आहे. परंतु या कारखान्यावर द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पंढरपूरमध्ये शरद पवार निवडणूक दौऱ्यावर आहेत. त्याची प्रचार सभा सुरु होती. करमाळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा सुरू होती.

या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी कारखान्यावर कारवाई सुरु झाली. याची माहिती मिळताच अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची सभा सोडून कारखान्याकडे धाव घेतली.श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे गोडाऊन सील झाले. त्यावरुन अभिजित पाटील यांनी नाराज व्यक्त केली. वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही. पवार साहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.