ख्रिसमसला करा हे खास लाजवाब आणि डिलीशियस केक! उत्साह अधिकच वाढेल  

1. ब्लॅक फॉरेस्ट केक

साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 100 मिली दूध किंवा पाणी, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 50 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 20 ग्रॅम कोको पावडर.

फिलिंग साठी : 400 ग्रॅम ताजे क्रीम, 500 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम चेरी, 50 ग्रॅम चॉकलेट आणि 6 चेर्‍या सजावटी साठी व 2 चमचे चेरी सिरप

बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे. 190 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. ताजी क्रीम एका भांड्यात घ्यावी त्यात साखर व इसेंस घालून 3 ते 4 तासांसाठी थंड करायला ठेवावी. नंतर त्याला चांगले फेटून घ्यावे. केक चे दोन भाग करावे. खालचा भाग चेरी सिरपमध्ये बुडवून त्यावर ताज्या क्रीमचे 1/3 भाग आणि काप केलेल्या चेरीचे तुकडे पसरावे. आता वरच्या भागालासुद्धा सिरपमध्ये बुडवून उरलेले क्रीम त्यावर पसरवावे. केकला चेरी आणि चॉकलेटने सजवावे. दोन तास थंडकरून सर्व्ह करावे.

2. चॉकलेट ब्राउनी केक

साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 80 मिली दूध, 60 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा कोको पावडर, 2 चमचा ब्राउन शुगर, 2 चमचा काळा रंग, 2 चमचा चॉको चिप्स, 30 ग्रॅम चॉकलेट. 

कृती : सर्वप्रथम क्रीम, बटर आणि कस्टर्ड मिल्क चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेंस घालून परत एकदा फेटावे. नंतर त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करावे. केकपात्राला तुपाचा हात लावून मैदा टाकावा आणि त्यावर हे मिश्रण ओतावे. 180 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. थंड झाल्यावर चॉकलेट सॉस आणि चॉको चिप्सने सजवून सर्व्ह करावी.