गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लयूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. मालेगावातील स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. मालेगावात स्वाइन फ्लूची एन्ट्री होऊनही दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुस्त आहे.
दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण्यात आले आहे.मालेगावात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असून स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे. मालेगावमधील ६३ वर्षीय महिलेचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्या महिलेस स्वाइन फ्लू झाल्यानंतर तिच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे.
गेल्या २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.सर्दी, खोकला, ताप व चालताना दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने जवळचे महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपला दवाखाना येथे तपासणी करून घ्यावी. औषधोपचार सुरू करावेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सूचना महापालिका आरोग्य विभागाने केले आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री अहिरे यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.