तलाठीपदासाठी पारदर्शक भरती प्रक्रिया करा! ठाकरे गटाचा सरकारला इशारा.

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते, आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. ही तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा घ्या, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा कैलास पाटील यांनी दिला आहे.

तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल. तर मग गुन्हे कसे दाखल झाले? याचं उत्तर सरकारने द्यावं. सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे.

असं कैलास पाटील म्हणाले.ही सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून राब्याने तलाठी भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी. अशी विद्यार्थ्यांच्या वतीने आमची आता सरकारकडे मागणी आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.