इचलकरंजीत गटारी तुंबल्याने डासांचे साम्राज्य…..

अलीकडे उष्मा तर खूपच आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास देखील होत आहे. त्यातच इचलकरंजी येथील नदीवेस लक्ष्मी मंदिर परिसरात सारण गटारी तुंबल्याने डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक उघड्यावरच कचरा व शेणखत टाकत आहेत. याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत असून, ते आजारी पडत आहेत.

परिसरात महालक्ष्मी मंदिर व स्वामी समर्थ मंदिर असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु भाविकांना कचरा व शेणखत दुर्गंधीचा त्रास होत आहे. तरी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.