सध्या निवडणुकीचे वारे तर वाहत आहेच पण अनेक गावांच्या यात्रा देखील सुरु झाल्या आहेत. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण रेठरे धरण येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा आज शनिवार म्हणजेच २७ एप्रिल ते मंगळवार, दि. ३० एप्रिलदरम्यान होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीळगंगा ओढ्याच्या काठावर हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरात हनुमानाची चार फूट उंचीची पाषाणातील मूर्ती आहे.
शनिवारी सायंकाळी गावातील महिला व पाहुण्या हनुमान मंदिरात पोळ्यांचा नैवेद्य घेऊन दर्शनासाठी येतात. सरपंच हर्षवर्धन मार्गदर्शनाखाली हनुमान यात्रा कमिटीने शनिवारी सायंकाळी ५:०० वाजता मिरवणूक व रात्री ९:०० वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. २८ रोजी सकाळी ८:०० व सायंकाळी ६:३० वाजता सीमाताई पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. सोमवार, दि. २९ रोजी दुपारी चार वाजता निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे.
मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी नितीन गवळी यांचा खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. गुरुवार, दि. ९ मे रोजी सायंकाळी ७:०० वाजता वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्ताने गोरक्षनाथ मठ, झेंडा चौक ते ज्योतिर्लिंग मंदिर, हनुमान मंदिर परिसरात विविध प्रकारचे खेळण्यांचे स्टॉल दाखल झाले आहेत.
