आटपाडी तालुक्यातील खरसुंडीत सिध्दनाथांची यात्रा मंगळवारपासून

सगळीकडे यात्राचा पाऊस सुरु आहे. गावोगावी यात्रांची रेलचेल वाढलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रसिध्द श्री नाथ देवस्थान सिध्दनाथांची यात्रा ३० एप्रिलपासून सुरू होत आहे. यामध्ये सासण काठी सोहळा दिनांक ५ मे रोजी मुख्य दिवस आहे.
या यात्रेसाठी महाराष्ट्र सह, आंध्रप्रदेश, कर्नाटक मधील लाखो भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सिध्दनाथाच्या वास्तव्याने पावन झालेले खरसुंडी हे तिर्थक्षेत्र आहे. प्रति वर्षी १५ लाखाहून जास्त भाविक या तिर्थ क्षेत्रास भेट देवून नाथ दर्शनाने तृप्त होता.

चैत्र यात्रेतील सासनकाठी व पालखी सोहळा हा उत्सव रविवारी ५ मे रोजी संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थाचे चेअरमन चंद्रकांत पुजारी यांनी दिली. ते म्हणाले, श्री क्षेत्र खरसुंडी येथील पारंपारिक चैत्र यात्रा मंगळवार दि. ३० एप्रिल पासून सुरू होत असून यात्रेचे मुख्य आकर्षण असणारे सासण काठी व पालखी सोहळा रविवारी ५ मे रोजी व रथोत्सव सोमवार दि. ६ में. रोजी आहे. बुधवारी १ मे श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा, रविवार दि. ५ मे रोजी दुपारी २ वाजता पालखीचे श्रीनाथ मंदिरापासून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान व सासणकाठी सोहळा.

सोमवार दि. ६ मे राजी रथोत्सव सोहळा जोगेश्वरी सोहळा जोगेश्वरी मंदिरापर्यंत रथ मिरवणूक होणार आहे. श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी यांच्यावतीने मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारीची व्यवस्था, आरओ पाणी पिण्याची व्यवस्था, सिक्युरिटी व स्वंयसेवकांची नेमणूक तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल यांसहपोलिस यंत्रणा तसेच आरोग्य सेवा, लाईट जनरेटर व्यवस्था, सी. सी. टी. व्ही. साऊंट सिस्टीम व्यवस्था आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी येणा-या सर्व भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.