आटपाडीतील महायुतीच्या नेत्यांमध्ये……

सांगली लोकसभा मतदार गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख सुहास बाबर संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत स्पष्ट संकेत नाहीत. तरीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्याचा कल नेमका कोणाकडे असणार? याबाबत राजकीय वर्तुळातून चर्चा रंगली आहे. आटपाडी तालुक्यातील महायुतीच्या तिन्ही पक्षांकडील नेत्यांमध्ये कमालीचा दुरावा आहे. तर महाविकास आघाडीकडे तालुक्यात मोठ्या नेत्यांची उणीव आहे.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेमध्ये निवडून आलेल्या खासदार संजय पाटील यांच्यासाठी आटपाडी तालुक्यातील नेत्यांनी ताकद दिली होती. त्या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातून गोपीचंद पडळकर व भारत पाटील गट सोबत होता. दुसरीकडे अजित घोरपडे यांच्या बाजूने आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट होता. २०१९ मध्ये गोपीचंद पडळकर वंचित आघाडीमधून लोकसभेच्या मैदानात होते.

स्वाभिमानीकडून लढणाऱ्या विशाल पाटील यांना माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची साथ होती. मात्र आमदार अनिल बाबर व राजेंद्र देशमुख गट संजय पाटील यांच्या बाजूने राहिला. यावेळी झालेल्या तिरंगी लढतीने संजय पाटील यांचा विजय सुकर झाला होता. आटपाडी तालुक्यातून गोपीचंद पडळकरांना मताधिक्य मिळाले होते.