दिघंची- हेरवाड महामार्गावर चर खोदाईच्या कामाने रस्त्यावर खड्डे

सध्या पावसाचे दिवस आहेत. आटपाडी आटपाडी तालुक्यातून दिघंची हेरवाड हा महामार्ग जात असून, हा महामार्ग आटपाडी ते सलगरे असा मिरज बांधकाम विभागाकडे आहे. या महामार्गावरील पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी काढण्यात येणाऱ्या चरीसाठी चेन असणाऱ्या पोकलेन मशिनचा वापर केला जात असल्याने डांबरीकरण खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्या पावसाचे पाणी डांबराच्या रस्त्यावरून वाहून जावे. यासाठी दोन्ही बाजूस चरी व साइड पट्टी व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे.

हे काम करताना जेसीबी किंवा अन्य मशिनचा वापर करत असताना, तो डांबरीवर न करता इतर ठिकाणाहून करणे उचित आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने पोकलेन मशिनच्या सहाय्याने काम सुरू केले आहे. आटपाडी ते सलगरे असा महामार्ग गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार केला आहे. डांबरीला धोका पोहचू नये, यासाठी चरी मारणे, अनावश्यक वाढलेली झुडपे काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे करत असताना चेनच्या मशिनचा वापर केला जात आहे.

परिणामी चेनचे मशिन पुढे मागे करत असताना डांबरीवर मोठ्या रेषा उमटत आहेत. यामुळे रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. अधिकारी वर्गाने दक्ष राहून चुकीच्या पद्धतीने होत असणाऱ्या मशिनचा वापर थांबवण्याची मागणी होत आहे.