महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण…

रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला अधिक खर्च असतो. दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे.

स्वयंपाक घरानंतर म्हणजे स्वयंपाकाचे तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळे यांच्यापाठोपाठ महागाई बाथरूमकडे सरकली आहे. ही काही गंमतीशीर गोष्ट नाही. चालू तिमाहीत आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.ज्या पाम तेलापासून साबण तयार केला जातो. त्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साबणाच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे. ज्यामुळे देशातील FMCJ कंपन्यांनी आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत वाढ केली आहे.दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे.

अनियमित हवामानामुळे उत्पादन घटल्याने HUL आणि टाटा कन्झ्युमर सारख्या कंपन्यांनीही अलीकडे चहाच्या दरात वाढ केली आहे.सप्टेंबर तिमाहीच्या निकालादरम्यान अनेक सूचीबद्ध कंपन्यांनी आपले मार्जिन वाचविण्यासाठी चालू तिमाहीत साबणाच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोकोच्या किंमतीतही वाढ होत आहे.

देशातील सर्वात मोठी FMCJ कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनेही चहा आणि स्किन क्लिंजर उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये डव्ह, लक्स, लाईटबॉय, लिरिल, पियर्स, रेक्सोना आदी ब्रँडअंतर्गत साबणाच्या व्यवसायाचा समावेश आहे. आयात शुल्कवाढीसह जागतिक किमती वाढल्याने सप्टेंबरच्या मध्यापासून पाम तेलाच्या किंमती तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.