अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ नदीवेस सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ अखंड नाम, जप, यज्ञ, श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह ३० एप्रिल ते ६ मेदरम्यान आहे. आज (ता.२९) ग्रामदेवता मानसन्मान, यज्ञभूमी पूर्वतयारी, मंगळवारी (ता.३०) मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचनास सुरुवात. बुधवारी (ता.१) नित्य स्वाहा:कार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग,
गुरुवारी (ता.२) नित्यस्वाहा:कार, श्री स्वामी याग, शुक्रवारी (ता.३) नित्य स्वाहा:कार, श्री चंडी याग, शनिवारी (ता.४) नित्य स्वाहा:कार, श्री गीताई याग, रविवारी (ता.५) नित्य स्वाहा:कार, रुद्र याग, मल्हारी याग, बुधवारी (ता.६) बली पूर्णाहूती, सत्यदत्तपूजन व अखंड नाम जप यज्ञाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
सप्ताह काळात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात येणार आहेत. सामुदायिक गुरुचरित्र वाचन सकाळी भूपाळी आरतीनंतर सुरू होईल, अशी माहिती सेवा केंद्रातर्फे दिली.